Wednesday, September 12, 2007

Online मराठी साहित्य - संगीत संग्रह

मराठी साहित्य - संगीताचा आवाका खूप मोठा आहे. मला वाचनाची खूप आवड नसली, तरी चांगले पुस्तक, लेख, कविता - गाणी वाचायला - ऐकायला आवडतात. इथे US मध्ये मराठी पुस्तके मिळणे अवघड आहे, त्यामुळे आपण वाचलेल्या online साहित्याच्या - लिखाण / MP3 Download - links इथे post करू, म्हणजे सगळ्यांनाच त्याचा आनंद घेता येईल.

To start the series,
This this my favorite : पु.ल. देशपांडे लिखित चितळे मास्तर :
http://cooldeepak.blogspot.com/2007/07/blog-post_14.html

Enjoy by sharing ....

Friday, September 7, 2007

Posted by आरती लेले : मराठी सण तिथीनुसार

गुढीपाडवा : चैत्र शुद्ध प्रतिपदा
रामनवमी : चैत्र शुद्ध नवमी
हनुमान जयंती : चैत्र पौर्णिमा
अक्षय्य तृतीया : वैशाख शुद्ध तृतीया
बुद्ध पौर्णिमा : वैशाख पौर्णिमा
वट पौर्णिमा : ज्येष्ठ पौर्णिमा
गुरु पौर्णिमा : आषाढ पौर्णिमा
नाग पंचमी : श्रावण शुद्ध पंचमी
नारळी पौर्णिमा/रक्षाबंधन : श्रावण पौर्णिमा
कालाष्टमी/गोपालकाला : श्रावण कृष्ण अष्टमी
पोळा / पिठोरी अमावास्या : श्रावण अमावास्या
हरितालिका : भाद्रपद शुद्ध तृतीया
गणेश चतुर्थी : भाद्रपद शुद्ध चतुर्थी
ऋषिपंचमी : भाद्रपद शुद्ध पंचमी
अनंत चतुर्दशी : भाद्रपद शुद्ध चतुर्दशी
पितृपक्ष : भाद्रपद कृष्ण पक्ष
सर्वपित्री अमावास्या : भाद्रपद अमावास्या
घटस्थापना : अश्विन शुद्ध प्रतिपदा
ललिता पंचमी : अश्विन शुद्ध पंचमी
विजयादशमी / दसरा : अश्विन शुद्ध दशमी
कोजगिरी / शरद पौर्णिमा : अश्विन पौर्णिमा
रमा एकादशी : अश्विन कृष्ण एकादशी
वसु बारस : अश्विन कृष्ण द्वादशी
धन तेरस : अश्विन कृष्ण त्रयोदशी
दिवाळी / नरक चतुर्दशी : अश्विन कृष्ण चतुर्दशी
लक्ष्मी पूजन : अश्विन अमावास्या
बलिप्रतिपदा : कार्तिक शुद्ध प्रतिपदा
भाऊबीज / यमद्वितीया : कार्तिक शुद्ध द्वितीया
त्रिपुरारी पौर्णिमा : कार्तिक पौर्णिमा
तुळशी विवाह : कार्तिक शुद्ध एकादशी ते कार्तिक पौर्णिमा
दत्त जयंती : मार्गशीर्ष पौर्णिमा
मकर संक्रांत : १४ जानेवारी (पौष)
गणेश जयंती : माघ शुद्ध चतुर्थी
वसंत पंचमी : माघ शुद्ध पंचमी
रथसप्तमी : माघ शुद्ध सप्तमी
महाशिवरात्री : माघ अमावास्या
होळीपौर्णिमा : फाल्गुन पौर्णिमा
धुलिवंदन : फाल्गुन कृष्ण प्रतिपदा
रंगपंचमी : फाल्गुन कृष्ण पंचमी